सध्या जॅकलिन पोल डान्स शिकतेय. होय, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. ही नव्या चित्रपटाचीच तयारी आहे. जॅकलिन लवकरच एका सिनेमात पोल डान्स करताना दिसणार आहे. त्यासाठीच तिने पोल डान्सचे क्लासेस लावले आहेत. रोसोलाना चुबेंको हिच्याकडे ती पोल डान्सचे धडे गिरवतेय. रोसोलाना हिनेच जॅकचा पोल डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडे जॅकने सोशल मीडियावर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला होता. ‘मजबूत दिमाग और नाजुक दिल के बीच फंसी हुई...’असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. अर्थात या फोटोवरून तिला बरेच ट्रोल व्हावे लागले होते. अनेक फॉलोअर्सने जॅकचा हा बोल्ड अवतार पाहून तिच्यावर टीका केली होती.
जॅकलिन सध्या दोन चित्रपटांमध्ये बिझी आहे. पहिला सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा ‘द जेंटलमॅन’ आणि दुसरा वरूण धवनसोबतचा ‘जुडवा2’. ‘द जेंटलमॅन’चा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाले आहे. येत्या आॅगस्टमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. उरला ‘जुडवा2’ तर त्यात जॅक वरूण धवनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यात तापसी पन्नूही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘जुडवा2’ हा १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. ‘जुडवा’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता.