Join us

फोटोत दिसणाऱ्या या दोन सख्ख्या बहिणी आज बॉलिवूडवर गाजवताहेत अधिराज्य, ओळखा पाहू कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:20 IST

बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. कधी एखादा फिल्मस्टार ट्रेंड होताना दिसतो, तर कधी टीव्ही स्टार्सचे फोटो व्हायरल होताना दिसतात. आज ज्या दोन गोंडस स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होतायेत आहेत त्या बॉलिवूडच्या ग्लॅमरस सिस्टर्सपैकी एक आहेत. फोटोत दिसत असलेल्या या दोन बहिणी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीच्या लाडक्या मुली आहेत. एका बहिणीने चित्रपटाच्या पडद्यावर अधिराज्य गाजवले आहे, तर दुसरी बहीण पदार्पणाच्या तयारीत व्यस्त आहे. या दोन बहिणींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

तुम्हाला दोन हिंट्स देणार आहोत, ज्यानंतर तुम्हाला या दोन बहिणींची नावे लगेच कळतील. फोटोमध्ये दिसणारी ही धाकटी बहीण शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानसोबत डेब्यू करणार आहे. तर मोठ्या बहिणीने आपल्या पहिल्याच धडक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.  आम्हाला माहित आहे की या दोन हिंट्सनंतर तुम्हाला या दोन अभिनेत्रींची नावं कळली असतील.  फोटोमध्ये दिसणार्‍या या दोन बहिणी आहेत, श्रीदेवीच्या लाडक्या मुली.. मोठ्या बहिणीचे नाव जान्हवी कपूर आणि लहान बहिणीचे नाव खुशी कपूर आहे.

जान्हवी कपूरने प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून लवकरच खुशी कपूरही डेब्बू करणार आहे. खुशी झोया अख्तरच्या सिनेमातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया करणार असून झोया आणि रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट एका लोकप्रिय कॉमिक सीरिजवर आधारित आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरखुशी कपूर