Join us  

कोण होतास तू, काय झालास तू?, इमरान खानचे लेटेस्ट फोटो बघून तुम्हीही हेच म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 1:21 PM

अभिनेता इमरान खानचे लेटेस्ट फोटो समोर आला आहे. तो पाहून त्याला ओळखणंही चाहत्यांना कठीण जातंय.

आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान (imran khan ) याने ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.  हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आज इमरान बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर आहे. त्याचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. यात त्याला ओळखंण हा कठीण झालं आहे. आमिर खानची लेक इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ईद सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केलेत. यातील एका फोटोमध्ये अभिनेता इमरान खानसुद्धा दिसतोय. मात्र यात तिला ओळखणंही कठीण झालंय. 

फोटोमध्ये इमरान अफव्हाईट रंगाच्या पठाणीमध्ये बसलेला दिसतोय. इराने शेअर केलेल्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला ओळखायला येत नाही.

इमरान खानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता.

इमरान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. म्हणजेच इमरानच्या पर्सनल लाईफमध्येही प्रॉब्लेम्स आहेत. इमरानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. 

टॅग्स :इमरान खानबॉलिवूड