...यासाठी भेटली डिप्पी रणबीरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 09:35 IST
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दिपीकाच्या मित्राचे लग्न होते. त्यासाठी दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग तिथे गेले होते. मात्र, त्याअगोदर दिपीका ...
...यासाठी भेटली डिप्पी रणबीरला?
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दिपीकाच्या मित्राचे लग्न होते. त्यासाठी दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग तिथे गेले होते. मात्र, त्याअगोदर दिपीका रणबीरला भेटायला गेल्याचे चर्चेत आले. ती त्याला कशाला भेटली इथपासून ते रणवीर सिंगही श्रीलंकेत आला ?या सर्व चर्चांना अक्षरश: उधाण आले. मात्र, कोणतेही तर्क-वितर्क काढण्याअगोदर तुम्हाला हे सांगण्यात येते की, ते एका त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चर्चेसाठी भेटले होते. हा चित्रपट रोमँटीक असून ते तिथे अतिशय प्रोफेशनल रिलेशनशिपच्या दृष्टीकोनातून भेटले.बॉलीवूडमधील सर्वांत यशस्वी कपल्सपैकी एक असूनही त्यांच्याविषयी असे तर्क काढण्यात आले. त्यांच्या या चित्रपटाची घोषणा लवकरच होईल.