Join us

​प्रियांका चोप्राचे ‘Young and Free’ हे गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 14:55 IST

‘एग्जॉटिक’ आणि ‘इन माय सिटी’ अशा हिट गाण्यानंतर प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा आपले एक नवे गाणे घेऊन आली आहे. होय, ‘यंग अ‍ॅण्ड फ्री’ असे शीर्षक असलेले प्रियांकाचे सिंगल रिलीज झाले आहे.

‘एग्जॉटिक’ आणि ‘इन माय सिटी’ अशा हिट गाण्यानंतर प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा आपले एक नवे गाणे घेऊन आली आहे. होय, ‘यंग अ‍ॅण्ड फ्री’ असे शीर्षक असलेले प्रियांकाचे सिंगल रिलीज झाले आहे. या गाण्यात तिच्यासोबत आहे आॅस्ट्रेलियाचा डीजे विल स्पार्क. विशेष म्हणजे, हे गाणे स्वत: प्रियांकाने लिहिलेले आहे. सध्या  इंटरनेटवर पीसीच्या याच गाण्याची धूम आहे.आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर मी हे गाणे लिहिलेय. यावेळी मला स्वातंत्र्याची सर्वाधिक गरज वाटतेय, हाच या गाण्याचा मतितार्थ आहे. प्रत्येकाची स्वातंत्र्याची गरज वेगवेगळी आहे. माझ्यामते, तारूण्य आणि स्वातंत्र्य हा एक विचार आहे. या दोन गोष्टी प्रत्येकाची गरज आहे. असे प्रियांका एका मुलाखतीत म्हणाली. हे गाणे सुंदर बनविण्यामागे विलचा मोठा हात आहे. विलने संगीताने या गाण्यांच्या शब्दांना नवा साज चढवला. असे ती म्हणाले.  २०१२मध्ये प्रियांकाने ‘इन माय सिटी’ हे पहिले गाणे सादर केले होते. यानंतर प्रियांकाने पिटबुलसोबत ‘एग्जॉटिक’ आणि ‘इन माय सिटी’ ही दोन गाणी सादर केली होती. ‘यंग अ‍ॅण्ड फ्री’हे तिचे चौथे सिंगल आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिअलचे दोन भाग केल्यानंतर प्रियांका ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटात दिसली. ‘बेवॉच’नंतर प्रियांकाच्या झोळीत आणखी दोन हॉलिवूड चित्रपट आहेत. एक म्हणजे,‘ए किड लाइक जॅक’ आणि दुसरा म्हणजे, ‘इजन्ट इट रोमॅन्टिक?’ यापैकी ‘ए किड लाइक जॅक’चे शूटींग पूर्ण झाले आहे आणि ‘इजन्ट इट रोमॅन्टिक?’ चे शूटींग सुरू आहे. ‘इजन्ट इट रोमॅन्टिक?’  हा चित्रपट न्यूयॉर्कच्मधील आर्किटेक्ट नटालीच्या आयुष्यावर आधारित आहे.  या चित्रपटात प्रियांका चोप्रा  योग अ‍ॅम्बेसिडर इसाबेलची भूमिका साकारते आहे.