हृतिकचा हा व्हिडीओ बघून एक गोष्ट तर स्पष्ट होत आहे. ती म्हणजे, कंगनाच्या मुलाखतीच्या व्हिडीओप्रमाणेच हृतिकचा हा व्हिडीओदेखील सर्वत्र धूम उडवून देईल. त्यातच कंगनाची बहीण रंगोलीदेखील तिच्या सपोर्टकरिता मैदानात उतरल्याने हृतिकला या दोघींचा सामना करावा लागणार आहे. कारण रंगोली सातत्याने हृतिकवर राग व्यक्त करण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून हल्ले करीत आहे. त्यातच दोघांकडूनही हे प्रकरण मिटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात नसल्याने, आगामी काळात याचे काय परिणाम होतील हे बघणे मजेशीर ठरेल.#HrithikSpeaksToArnab | Which question do you think will nail the whole controversy? Let us know and tune in at 8 pm on Saturday. pic.twitter.com/IJAFMnqUS5— Republic (@republic) October 6, 2017
खरंच हृतिक रोशनने कंगना राणौतला पॅरिसमध्ये प्रपोज केले होते काय? पहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:07 IST
गेल्या काही काळापासून कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद अक्षरश: विकोपाला गेला आहे. ज्या पद्धतीने दोघांकडूनही एकमेकांवर आरोपांच्या ...
खरंच हृतिक रोशनने कंगना राणौतला पॅरिसमध्ये प्रपोज केले होते काय? पहा व्हिडीओ!
गेल्या काही काळापासून कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद अक्षरश: विकोपाला गेला आहे. ज्या पद्धतीने दोघांकडूनही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, त्यावरून हा वाद लवकर संपेल असे दूरदूरपर्यंत दिसत नाही, असेच म्हणावे लागेल. हृतिकसोबत असलेल्या नात्याविषयी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्य करणाºया कंगनाच्या आरोपांना आता हृतिकनेही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्याने ट्विटरच्या माध्यमातून एक स्टेटमेंट देत कंगनाकडून केल्या जात असलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. कंगनाला खोटं ठरविण्यासाठी हृतिकने वरिष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्या शोवर येऊन याविषयीचे स्पष्टीकरणही दिले आहे. आता अर्नब यांच्या चॅनलकडून व्हिडीओ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हृतिक अर्नब हृतिकला विचारत आहेत की, ‘तू गेल्या काळापासून कंगनाच्या आरोपांवर शांत का होता? त्याचबरोबर हृतिकला हेदेखील विचारण्यात आले की, तू कंगनाला पॅरिसमध्ये लग्नासाठी प्रपोज केले होते काय? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर देताना हृतिक म्हणतो की, ‘आता चार वर्षे झाली आहेत, त्यामुळे मी आता यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. त्यामुळेच मी माझे मौन तोडले आहे. पेरिसविषयी सांगायचे झाल्यास, मी जेव्हा पेरिसला होतो तेव्हा ती दुसरीकडे होती.