Join us

कानिकामुळे दीया-साहिलचे मोडले होते का लग्न ? अभिनेत्री दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:02 IST

Dia mirza sahil sangha saperation truth kanika dhillon gives clearity over the issue : . दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा बॉयफ्रेड साहिल सिंघाशी लग्न केले होते.

2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब दीया मिर्झाने मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर येत होत्या. ‘तिने रहेना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा बॉयफ्रेड साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलसोबत तिने 2019 मध्ये घटस्फोट घेत वेगळी झाली. दीया आणि साहिल दोघांच्या घटस्फोटाने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

कनिका ढिल्लनचं दीया मिर्झाचा नवरा साहिल सांगासोबत अफेयर होते. ज्यामुळे दीया नवऱ्यापासून वेगळे झाली. मात्र यावर दीया मिर्झाने लिहिले, माझे साहिलपासून विभक्त होण्याचे कारण स्पष्ट आहे आणि मी माध्यमांमध्ये लावल्या जाणाऱ्या अनुमानांना मी विराम देते. जबाबदार राहण्याची पातळी दुर्दैवी आहे. आमच्या सहकर्मचाऱ्यांचं नाव त्यात ओढले जात आहे हे अधिक वेदनादायक आहे. माझ्या आणि साहिलच्या विभक्त होण्यामागे तिसर्‍या व्यक्तीची कोणतीही भूमिका नाही. मी माध्यमांना विनंती करते की या वेळी काही गोपनीयतेची परवानगी द्या. आशा आहे ते याचा आदर करतील.

टॅग्स :दीया मिर्झा