Join us

डॅडी सैफ अली खान होता का करिना कपूरसोबत लेबर रुममध्ये..जाणून घ्या आमच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:47 IST

आज सकाळी करिना कपूरने सैफ आणि तिच्या बाळाला जन्म दिला. याबाळाचे नाव तैमूर अली खान पटौदी ठेवण्यात आले. बाळाच्या ...

आज सकाळी करिना कपूरने सैफ आणि तिच्या बाळाला जन्म दिला. याबाळाचे नाव तैमूर अली खान पटौदी ठेवण्यात आले. बाळाच्या जन्माच्यावेळी संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. सैफने घातलेल्या कपड्यांकडे जर आपण नीट लक्ष दिले तर आपल्या लक्षात येते सैफ कदाचित करिनासोबत लेबररुममध्ये प्रसुतीदरम्यान हजर असावा. रुग्णालयाच्या बाहेर सैफ या ग्रीन कर्लरच्या कपड्यांमध्ये दिसला. साधारण हे कपडे डॉक्टर प्रसुतीदरम्यान लेबरमध्ये घालतात. लग्नझाल्यापासून प्रत्येक पार्टीत सैफ करिनाच्या हातात हात घालून येताना दिसला आहे. त्यामुळे करिनाच्या प्रसुतीदरम्यान तो लेबरमध्ये उपस्थित असावा असा अंदाज बांधण्यात येतोय.     करिनाने प्रेग्नंसीचा आनंद अतिशय  सुंदरपणाने लुटला. प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत ती प्रत्येक पार्टी कधी सैफबरोबर तर कधी मैत्रिणींनीसोबत हजर असायची. रॅम्पवॉकपासून ते मॅगझिनच्या कव्हर पेजसाठीचे फोटोशूट करिना करत होती. आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी ती प्रेरणा बनली आहे. 2012मध्ये सैफ आणि करिना लग्नाच्या बेडीत अडकले. याआधी सैफचे अमृता सिंगसोबत लग्न झाले होते.