डायना पेन्टीच्या नावाची मिका सिंगने उडविली खिल्ली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 16:30 IST
हॅप्पी भाग जायेगी'ची नायिका डायना पेन्टीच्या नावावरुन कमरेखालचा विनोद केल्यामुळे गायक मिका सिंगवर डायनाचे चाहते नाराज झाले आहेत. चित्रपटाच्या ...
डायना पेन्टीच्या नावाची मिका सिंगने उडविली खिल्ली !
हॅप्पी भाग जायेगी'ची नायिका डायना पेन्टीच्या नावावरुन कमरेखालचा विनोद केल्यामुळे गायक मिका सिंगवर डायनाचे चाहते नाराज झाले आहेत. चित्रपटाच्या म्यूझिक लाँचच्यावेळी मिका सिंगने डायनाच्या नावाची खिल्ली उडवली होती. डायनाला तो 'देना' म्हणत होता. तर पॅन्टी नावावरही तो घसरला. तिला फोटोसाठी जवळ बोलवताना शेजारी उभा राहून 'डायना पॅन्टी, गबरु कच्छा' ( कच्छाचा मराठीत अर्थ चड्डी असा होता ) असे म्हणाला.डायनाच्या नावाची आणि आडनावाची जेव्हा मिका सिंग खिल्ली उडवत होता तेव्हा स्टेजवर निमार्ता कृष्णा लुल्ला, दिग्दर्शक मुदस्सर अझीझ आणि इतर कलाकार उपस्थित होते. मिकाने उडवलेली खिल्ली डायनाला पसंत आली नाही. पण तिने इव्हेन्ट डिस्टर्ब होईल म्हणून कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. डायनाच्या नावावरील या टिप्पणीचा राग मात्र डायनाच्या चाहत्यांना आला आहे.'हॅप्पी भाग जायेगी' या चित्रपटात डायना पेन्टी, जिमी शेरगिल, अभय देओल, अलि फाजल आणि मोमल शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९ आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.