चित्रपट साईन करण्याची डायनाला नाही घाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:04 IST
अभिनेत्री डायना पेंटी हिचा ‘कॉकटेल’ नंतर दुसरा चित्रपट येण्यास एवढा वेळ का लागतो? असा प्रश्न तिच्या चाहत्यांसोबतच दिग्दर्शकांनाही ...
चित्रपट साईन करण्याची डायनाला नाही घाई!
अभिनेत्री डायना पेंटी हिचा ‘कॉकटेल’ नंतर दुसरा चित्रपट येण्यास एवढा वेळ का लागतो? असा प्रश्न तिच्या चाहत्यांसोबतच दिग्दर्शकांनाही पडतो. या प्रश्नाचे उत्तर देतांना ती म्हणते,‘ मला आॅफर्स येत राहतात. पण जोपर्यंत एखादी भूमिका मला मनापासून आवडत नाही तोपर्यंत मी तिचा स्विकार करत नाही. माझ्यावर चित्रपट साईन करण्याचे कुठलेही दडपण नसते.‘कॉकटेल’ नंतर मी स्वत:ला कुठल्या भूमिकेसाठी योग्य ठरू शकते का? हे लक्षात येण्यासाठी मला बराच वेळ लागतो आहे. मी कुठलाही चित्रपट करत नाही तर मी योग्य भूमिका, चित्रपटाची वाट पाहते.’ डायना मुदस्सर अझिझ यांच्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणते,‘ स्क्रिप्ट फारच वेगळी आहे. कॉकटेलपेक्षाही माझी भूमिका यात महत्त्वाची आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून मला यात खुपच वाव आहे. मी हा चित्रपट केल्याने मला खुप आनंद होतोय. ’ चित्रपट १९ आॅगस्टला रिलीज होणार आहे.