Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआआधीच प्रेग्नंट राहिलेल्या दीया मिर्झाने ट्रोलर्सला दिले उत्तर, सांगितले प्रेग्नंसी लपवण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:15 IST

Dia Mirza clarifies she didn’t marry Vaibhav Rekhi because Her Pregnancy: दीया मिर्झाच्या लग्नातही पुरुषाऐवजी एका महिला पंडित पुजा-याने धार्मिक विधी केल्या एकंदरित लग्नात पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता. तर मग  स्त्री लग्नाआधी गर्भवती का होऊ शकत नाही?

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले. यानंतर दीयाला तिच्या प्रेग्नंसीमुळे सोशल मीडियावर जबरदस्त  ट्रोल केले जात होते.15 फेब्रुवारीला दीयाने उद्योगपती वैभव रेखीसह लग्न दुसरे लग्न केले. वभव रेखीचेही हे दुसरे लग्न आहे.

 

लग्नाच्या  अवघ्या 45 दिवसांनीच दीयाने बेबी बंप असलेला फोटो शेअर करत चाहत्यांसह तिची गुड न्यूज शेअर केली आणि तिथून दीया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या अफवा अखेर खरी ठरली. दीया प्रेग्नंट राहिली म्हणून तिने दुसरे लग्न केले असे नेटीझन्स तिच्याविषयी बोलताना दिसत आहेत. मात्र,आता दीयाने प्रेग्नंसीमुळे लग्न केले नसल्याचे सांगितले आहे. कोणत्याही गोष्टीमुळे दबावात येऊन मी दुसरे लग्न केले नाही.

दिया मिर्झाच्या प्रेग्नंसीवरुन एका युजरने तिला कमेंट करत सांगितले की, 'ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला खूप शुभेच्छा. लग्नातही पुरुषाऐवजी एका महिला पंडित पुजा-याने धार्मिक विधी केल्या एकंदरित लग्नात पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता. तर मग  स्त्री लग्नाआधी गर्भवती का होऊ शकत नाही? विचारलेल्या प्रश्नावर दीया म्हणाली की, हा एक चांगला प्रश्न आहे.

 

पहिली गोष्ट अशी की मी प्रेग्नंट राहिली म्हणून मी लग्न केलेले नाही. दोघांनाही आमचे आयुष्य एकत्र घालवायचे होते, 'जेव्हा आम्ही दोघे  लग्नाचे प्लॅनिग करत होतो, तेव्हाच आम्हाला आमच्या बाळाबद्दल कळाले होते. मात्र काही मेडिकल गोष्टींमुेळे प्रेग्नंसी जाहीर केली नव्हती. 

आम्हाला पूर्ण खात्री होईपर्यंत आम्हाला ही बाब कोणालाही सांगायची इच्छा नव्हती.दीया म्हणाली की तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. मी बरीच वर्षे या क्षणाची वाट पाहात होती. मी फक्त वैद्यकीयदृष्ट्या सर्व काही सुरळीत होण्याची वाट पाहत होती. दीया पुढे म्हणाली की मुलाला जन्म देणे ही सर्वात सुंदर भावना आहे आणि मला हा प्रवास अधिक सुंदर बनवाचा आहे त्यात कोणत्याही प्रकारची लाज बाळगण्याचे असे कारण नाही.

दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

टॅग्स :दीया मिर्झा