Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘फ्रोझन एग्ज’द्वारे दुस-यांदा आई होणार डायना हेडन! देणार जुळ्या मुलांना जन्म!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 11:30 IST

माजी मिस इंडिया डायना हेडन दुस-यांदा आई होणार आहे. होय, डायना जुळ्या मुलांची आई होणार आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट ...

माजी मिस इंडिया डायना हेडन दुस-यांदा आई होणार आहे. होय, डायना जुळ्या मुलांची आई होणार आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, डायनाची ही प्रेग्नंसी सामान्यपद्धतीने झालेली नसून, तीन वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजाच्या (फ्रोझन एग्ज) माध्यमातून ती आई होणार आहे.  ४४ वर्षीय डायनाने जानेवारी २०१६ मध्येही फ्रोझन एग्ज पद्धतीनेच पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी, आठ वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजातून तिला अपत्यप्राप्ती झाली होती.तीन वर्षांपूर्वी डायनाने बीज जतन करून ठेवले होते. डायनाच्या डॉक्टर असलेल्या आयव्हीएफ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गत काही वर्षांत अप्रत्यप्राप्तीच्या पद्धती प्रचंड आधुनिक झाल्या आहेत,असे डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या. चाळीशीत गर्भधारणेसाठी काही स्त्रिया बीज जतन करुन ठेवण्याची पद्धत वापरतात. दशकभरापूर्वी ही पद्धत आव्हानात्मक मानली जात होती. पण आज हे तंत्रजान बरेच प्रगत झाले आहे. पस्तिशीतील हजारो स्त्रिया बीज गोठवून ठेवत आहेत. आजच्या अनेक मुलींना लग्न करायचे नसते. तर कुणाला योग्य जोडीदाराचा शोध असतो. अशा महिला या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याअंतर्गत इनफर्टिलिटह तंत्राद्वारे महिला आपले बीज गोठवू शकतात आणि मग काही महिने वा वर्षांनंतर गर्भधारण करू शकतात. उणे १९६ डिग्री सेल्सिअस तापमानात सुमारे १० वर्षे हे बीज जतन करता येऊ शकते. चाळिसाव्या वर्षी डायना अमेरिकेतील कॉलिन डिकच्या प्रेमात पडली होती. याच कॉलिनसोबत तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. डायना व कॉलिन लग्नबंधनात अडकले. त्याचवेळी स्वत:ला एंडोमेट्रिओसिस असल्याचे तिला कळले होते. यास्थितीत महिलांना गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीसाठी डायनाने बीज गोठवण्याचा निर्णय घेतला होता.डायना ‘बिग बॉस’मध्येही दिसली होती. डायना हेडन   ही एक भारतीय विश्वसुंदरी आहे. १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाºया डायनाने त्याच वर्षी सेशेल्समध्ये घेण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. रीटा फारिया व ऐश्वर्या रायनंतरची  ही स्पर्धा जिंकणारी डायना तिसरी भारतीय महिला ठरली होती.