Join us

मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी अन् आता रणवीर सिंहच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार! किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 09:30 IST

रणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. बर्थडेला रणवीरने स्वत:लाच इलेक्ट्रिक कार गिफ्ट केली आहे. 

बॉलिवूड सेलिब्रिटींकडे महागड्या गाड्या असणं ही काही नवी गोष्ट नाही. पण, इलेक्ट्रिक कार फार कमी सेलिब्रिटींकडे आहे. या यादीत आता रणवीर सिंहचं नावही जोडलं जाणार आहे. रणवीर सिंहने नुकतीच नवी कोरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. रणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. बर्थडेला रणवीरने स्वत:लाच इलेक्ट्रिक कार गिफ्ट केली आहे. 

रणवीरने Hummer EV 3X ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल ४.५ कोटी इतकी आहे. Hummer EV 3X ही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणारा रणवीर पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. याशिवाय रणवीरकडे रेंज रोव्हर, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज, जॅग्वार या महागड्या गाड्या आहेत. 

दरम्यान, रणवीर 'धुरंदर' या त्याच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या अॅक्शन पॅक सिनेमात रणवीरचा कधीही न पाहिलेला अवतार दिसणार आहे. रणवीरसोबत या सिनेमात सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन अशी स्टारकास्ट आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगकार