Join us

​धोनीच्या बायोपिकचा ट्रेलर धोनीच्याच हस्ते होणार रिलीज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 12:39 IST

भारतीय क्रिकेटचा  यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर दिल्ली, मुंबई आणि जालंधर ...

भारतीय क्रिकेटचा  यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर दिल्ली, मुंबई आणि जालंधर या तीन शहरांमध्ये धोनीच्याच हस्ते रिलीज होणार आहे. या चित्रपटात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. निर्मात्यांनी दिल्ली, मुंबई आणि जालंधर या तीन शहरात लाँचिंग कार्यक्रमाचं स्थळ अजून निश्चित केलेलं नाही. धोनी संपूर्ण देशासह जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरात धोनीच्या हस्ते ट्रेलर लाँच करणं चांगली संधी असेल, असं सिनेमाचे दिग्दर्शक निरज पांडे यांनी सांगितलं.