Join us

Dharmendra यांनी ६२ वर्ष जुनी कार डोंगराळ रस्त्यांवर सुसाट पळवली, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 18:05 IST

Dharmendra : धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लिहिलं की, 'ही माझी सर्वात आवडती, माझी पहिली फियाट. मी ही कार १९६० मध्ये खरेदी केली होती. आज ही कार मी डोंगरातील रस्त्यावर चालवली. हॅप्पी होली. लव यू ऑल. 

बॉलिवूडचा ही-मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते धर्मेंद्र (dharmendra) एक दिलदार आणि दिलखुलास व्यक्ती आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून हे नेहमीच दिसून येतं. त्यांनी नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांची कार चालवताना दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लिहिलं की, 'ही माझी सर्वात आवडती, माझी पहिली फियाट. मी ही कार १९६० मध्ये खरेदी केली होती. आज ही कार मी डोंगरातील रस्त्यावर चालवली. हॅप्पी होली. लव यू ऑल. 

काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभिनेत्री तनुजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. इतक्या वर्षांनी दोन्ही कलाकारांना एकत्र बघून फॅन्स खूश झाले होते. "चाहे रहो दूर, चाहे रहो पास... सुन लो मगर एक बात" हे दोन चोर सिनेमातील गाणं फारच फेमस आहे. आज दोघांचंही खूप वय झालं आहे.

धर्मेंद्र आणि तनुजाची जोडी सर्वात हिट जोड्यांपैकी एक होती. बऱ्याच वर्षांनी दोघे भेटले आणि त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी लिहिलं होतं की, 'शोभना जी, नूतन आणि तनुजा यांच्या एक जुनं कौटुंबिक नातं आहे. ते एकमेकांच्या घरी नियमितपणे येत-जात राहतात'. दरम्यान धर्मेंद्र इतक्या वयातही दिलखुलासपणे जगण्याचा आनंद घेताना दिसतात. ते नेहमीच त्यांच्या फार्महाउसचे व्हिडीओ शेअर करत असतात. कधी शेतात काम करताना दिसतात. तर कधी एक्सरसाइज करताना दिसतात. त्यांचा हाच अंदाज आजही त्यांच्या चाहत्यांना आवडतो. 

टॅग्स :धमेंद्रसोशल मीडिया