अभिनेता धनुष आणि क्रिती सेनन यांचा 'तेरे इस्क मे' सिनेमा महिना अखेरीस येणार आहे. सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच इव्हेंट झाला. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. धनुषच्या 'रांझणा'चीच अनेकांना आठवण झाली. तर आता 'तेरे इश्क मे'मध्ये धनुष आणि क्रितीची केमिस्ट्रीही लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान ट्रेलर लाँचवेळी धनुषला 'प्रेम' या भावनेबद्दल विचारलं असता त्याच्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
'तेरे इश्क मे'च्या ट्रेलर लाँचवेळी आनंद एल राय, धनुष आणि क्रिती स्टेजवर उभे होते. एका रिपोर्टरने धनुष आणि क्रितीला 'तुमच्यासाठी प्रेम काय आहे?' असा प्रश्न विचारला. यावर धनुष वैतागून म्हणाला, 'मला माहित नाही. मला वाटतं ही एक ओव्हररेटेड भावना आहे'. धनुषच्या या उत्तराने सगळेच आश्चर्यचकित झाले. मग प्रेक्षकांनी ओ....म्हणत त्याच्या उत्तराला दाद दिली. यावर क्रिती म्हणते, 'मला नाही वाटत शंकरला तुझं हे स्टेटमेंट शंकरला पटेल'.
धनुष सिनेमात शंकर या भूमिकेत आहे जो प्रेमासाठी कोणत्याही थराला जाणारा आशिक आहे. धनुषने २००४ साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्नगाठ बांधली होती. चेन्नईमध्ये त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर १८ वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलंही आहेत. धनुषचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. मात्र आता त्याच्या प्रेमाच्या संकल्पनेने सर्वांना चकित केलं आहे.
Web Summary : At 'Tere Ishk Mein' trailer launch, Dhanush deemed love overrated, surprising many. Kriti countered, disagreeing with his view. The film releases soon.
Web Summary : 'तेरे इश्क में' के ट्रेलर लॉन्च पर धनुष ने प्यार को 'ओवररेटेड' बताया, जिससे कई लोग हैरान रह गए। कृति ने उनके इस विचार से असहमति जताई। फिल्म जल्द रिलीज होगी।