Join us  

Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 4:00 PM

Dhaakad Movie Review : 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या.

कलाकार : कंगना राणौत, अर्जुन रामपाल, द‍िव्‍या दत्ता, शाश्वत चटर्जी, शारीब हाशमी दिग्दर्शक-  रजनीश घईशैली - अ‍ॅक्शन ड्रामारेटिंग : 2 स्टारचित्रपट परीक्षण : रंजू मिश्रा

कंगना रणौतने तिच्या स्पष्टवक्तेपणाने आणि बिनधास्तपणामुळे 'धाकड' अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. त्यामुळेच तिच्या 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या. कंगनाच्या या अ‍ॅक्शनचे खूप कौतुक झाले. अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनीही खलनायक म्हणून उत्सुकता वाढवली, पण हा चित्रपट खरोखरच चांगला आहे का, जाणून घेऊया.

कथाअग्नी (कंगना रणौत) ही एक स्पेशल एजंट आहे आणि ती मानवी तस्करीचे सिंडिकेट मोडून अनेक मुलींची सुटका करते. या मिशन दरम्यान, तिला एक पेन ड्राईव्ह सापडतो, ज्यामध्ये आशियातील मुलांच्या तस्करीचा मुख्य सूत्रधार रुद्रवीर (अर्जुन रामपाल) याचा तपशील असतो. रुद्रवीर त्याची जोडीदार रोहिणी (दिव्या दत्ता) सोबत कोळशाच्या खाणी बळकावण्यासोबतच लहान मुलांच्या तस्करीचा व्यवसाय करतात. ते थांबवणं हे एजंट अग्नीचे ध्येय आहे.

दिग्दर्शन 'धाकड' चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या रजनीश घई यांनीही या चित्रपटाच्या लेखनात योगदान दिले आहे. चित्रपटाची पटकथा अतिशय संथ आणि बोरिंग आहे. चित्रपट सुरुवातीपासूनच कंटाळवाणा वाटतो. अर्थहीन अ‍ॅक्शन सीक्वेन्समुळे अनेक ठिकाणी लॉजिकच कळत नाही.. कथा कधी मागे तर कधी पुढे जाते. चित्रपटात 'सो जा नन्ही.. सो जा...' हेच गाणे इतक्या वेळा रिपीट केले जाते की प्रेक्षकांनी ही झोप यायला लागते. 2 तास 13 मिनिटांचा हा चित्रपट 2 तास सुद्धा सहन करणे कठीण होते. दिग्दर्शकाने सर्व मसाला चित्रपटात वापरण्याचा प्रयत्न केला आहे, असे असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवू शकलेला नाही. काही ठिकाणी फक्त अ‍ॅक्शन सीन्स चांगले झाले आहेत.

अभिनय पहिल्याच सीनपासून एजंट अग्नि बनलेली कंगना अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. तिने इतर अभिनेत्रींसाठी निश्चितपणे एक बेंच मार्क सेट केला आहे. कंगनाने ज्या पद्धतीने अ‍ॅक्शन केले आहे ती तिच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही, पण या अ‍ॅक्शनच्या चक्करमध्ये कंगना अभिनय करायला विसरल्याचे दिसते. त्याच्या तुलनेत दिव्या दत्ता आणि अर्जुन रामपाल यांचा अभिनय उजवा ठरतो. दोघांनीही त्यांच्या निगेटीव्ह भूमिकेने बरीच रंगत आणली आहे. कंगनाचे एजंट बनलेले शरीब हाश्मी आणि शाश्वत चॅटर्जी यांनीही प्रभावित केले आहे. पण चित्रपटाच्या कथेत ताकद नसेल तर चांगली स्टारकास्टही काही करू शकत नाही. 'धाकड'च्या बाबतही हेच झालंय. 

निगेटीव्ह पाईंट्स : खराब पटकथा, विनाकारण टाकलेले अ‍ॅक्शन सीन्स, अनेक दृश्ये आणि गाण्याचे रिपीटेशनपॉझिटीव्ह पाईंट्स:  अभिनेत्रीची दमदार अ‍ॅक्शन, उत्तम व्हिएफएक्स आणि नयनरम्य स्थळसारांश: कथेत काहीच दम नाही. कंगनाचा हा निराशाजनक चित्रपट आहे. थिएटरमध्ये जाऊन ते पाहणे हे एखाद्या कठीण टास्कपेक्षा कमी नाही.

टॅग्स :कंगना राणौतअर्जुन रामपालसिनेमा