‘चॉकलेट बॉय असूनही, मी अडल्ट चित्रपट केले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:56 IST
‘टेबल नं. २१’, ‘सम्राट अॅण्ड को’ तसेच नुकताच आलेला ‘फिव्हर’ यात राजीव खंडेलवाल याने अतिशय ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ भूमिका ...
‘चॉकलेट बॉय असूनही, मी अडल्ट चित्रपट केले’
‘टेबल नं. २१’, ‘सम्राट अॅण्ड को’ तसेच नुकताच आलेला ‘फिव्हर’ यात राजीव खंडेलवाल याने अतिशय ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ भूमिका केली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना तो म्हणाला,‘ मला कधीच सस्पेन्स, थ्रिलर असे चित्रपट करायचे नव्हते. पण, स्क्रिप्टची डिमांड असल्याने मी हेल्पलेस होतो.मी एक चॉकलेट बॉय असूनही मला आत्तापर्यंत सर्व अडल्ट चित्रपटच मिळत्तले. अभिनय कोणत्याही भूमिकेतील असो तो स्वत:मध्ये उतरवता आला पाहिजे. बॉडी लँग्वेजमधून प्रेक्षकांना कळायला हवे की मुळ या कलाकाराचा स्वभाव वेगळा आणि तो जी भूमिका करतोय ती वेगळी. त्यामुळे जर थ्रिलर झोनमधून बाहेर काढले तर मी नक्कीच अडल्ड सोडून दुसरे चित्रपट करू शकेन.’