याविषयीची अधिक माहिती अशी की, २०११ मध्ये आयकर विभाग अपीलेट ट्रिब्यूनलने (आयटीएटी) प्रियंका चोपडाच्या घरी छापा मारला होता. तिच्या घरी एक लग्जरी वॉच आणि एक लग्जरी कार मिळाली होती. ज्याचा कर तिने भरला नव्हता. याविषयी प्रियंकाचे म्हणणे होते की, ज्या कंपनीला तिने एंडोर्स केले होते, त्याच कंपनीने तिला प्रमोशनल गिफ्ट म्हणून लग्जरी वॉच आणि कार दिली होती. मात्र आयकर विभागाच्या मते, आयकर कर कायद्याच्या कलम २५ (५) नुसार लग्जरी गिफ्टवर कर भरावाच लागेल.
दरम्यान प्रियंकाच्या घरात मिळून आलेली वॉच एलव्हीएमएच-टॅग कंपनीची असून, तिची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी आहे. तर टोयोटा कंपनीच्या कारची किंमत २७ लाख इतकी आहे. आता हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने प्रियंका कर भरणार की आणखी या प्रकरणाला वेगळे वळण येणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.