दिव्यांश पंडित म्हणतोय ‘सेन्सॉर दि मा दी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:13 IST
दिव्यांश पंडितने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाच्या दैनंदिन जीवनातील दिवस कसा असतो हे दाखविणारी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे.‘सेन्सॉर दि ...
दिव्यांश पंडित म्हणतोय ‘सेन्सॉर दि मा दी’
दिव्यांश पंडितने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाच्या दैनंदिन जीवनातील दिवस कसा असतो हे दाखविणारी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे.‘सेन्सॉर दि मा दी’ नावाच्या या शॉर्टफिल्ममध्ये सध्या सुरू असलेल्या वादावर विनोदीपद्धतीने चिमटे काढले आहे.कोणाचेही नाव न घेता दिव्यांशने बोर्डाचा एकुण आलबेल कारभारावर टीका केली आहे.बोर्डाचे अध्यक्ष कसे ‘पूर्ण कपडे’ घालून आंघोळ करतात हे पाहून नक्कीच हसू आल्या शिवाय राहत नाही.आता या शॉर्ट फिल्मलाही सेन्सॉरने ‘सेन्सॉर’ करू नये म्हणजे झाले.