चाहतीच्या मेसेजमुळे डिप्पी झाली भावनाविवश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:23 IST
दीपिका पदुकोन आणि सैफ अली खान यांच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली. यात दीपिका पदुकोनने ‘मीरा’ ...
चाहतीच्या मेसेजमुळे डिप्पी झाली भावनाविवश !
दीपिका पदुकोन आणि सैफ अली खान यांच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली. यात दीपिका पदुकोनने ‘मीरा’ नावाचे कॅरेक्टर अतिशय उत्तमरित्या केले आहे.दीपिकाच्या एका चाहतीने तिला इन्स्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट केला आहे की, ‘तू मीराची जी भूमिका केली आहेस ती मुलगी सर्वसामान्यांसारखीच आहे.पण, ज्या पद्धतीने मीरा तिच्या आयुष्यात काही निर्णय घेते ते खरंच खुप कौतुकास्पद आहेत. ती ज्या मुलावर प्रेम करत असते त्यालाही ती जाणवू देते की, त्याचेही तिच्यावर किती प्रेम आहे ते.’ ही नोट वाचल्यानंतर दीपिकानेही त्या चाहतीला ‘थँक यू’ असा रिप्लाय दिला आहे.