दीपिकाचा वर्कआऊट व्हीडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 15:00 IST
दीपिकाने वर्कआऊट करीत असल्याचा एक नवीन व्हीडीओ इंस्टाग्रावर अपलोड केला आहे
दीपिकाचा वर्कआऊट व्हीडीओ
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्याला फिटनेसवर अधिक लक्ष देत असल्याचे तिने सोशल मिडीयावर अलीकडेच अपलोड केलेल्या व्हीडीओवरुन दिसते. तिने वर्कआऊट करीत असल्याचा एक नवीन व्हीडीओ इंस्टाग्रावर अपलोड केला आहे. त्यामध्ये ती वर्कआऊट करीत असल्याची दिसत आहे. वर्कआऊट दरम्यान ती ‘डा डा डिंग गाणे ऐकत सोबतच पुश अप्स करीत आहे. दीपिका ही आपल्या फिटनेस व्हीडीओ चाहत्यांसाठी शेअर करीत असते. ती लवकरच हॉलिवूडमध्ये ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ जैन्डर कै ज’ मध्ये विन डीजल सोबत दिसणार आहे. त्यामुळे ती मागील काही दिवसापासून खूप उत्साहीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गत महिन्यात लॉन्च करण्यात आला. पुढील वर्षी २० जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.