Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दीपिकाचा निराश विद्यार्थी-पालकांना मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:29 IST

बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेत्री दीपिका पादुकोनने ट्विटरवरून कमी गुण मिळाले म्हणून नाराज, निराश विद्यार्थी आणि पालकांना संदेश दिला आहे.तिने ...

बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेत्री दीपिका पादुकोनने ट्विटरवरून कमी गुण मिळाले म्हणून नाराज, निराश विद्यार्थी आणि पालकांना संदेश दिला आहे.तिने ट्विट केले की,  लिफटमधून जात असताना मला कमी मार्क मिळाले म्हणून नाराज मुलगा भेटला. त्याची आई त्याला म्हणत होती की, चांगले आयुष्य जगायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर तुला चांगले मार्क मिळवावेच लागतील. हे ऐकून मला आश्चर्य वाटले.मी जेव्हा त्यांना सांगितले की, मला केवळ ६५ टक्के होते तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. मला म्हणाल्या, फक्त ६५! मी म्हणाले, हो. परीक्षेतील मार्कांपेक्ष जीवनात इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात.आपल्याला जे आवडते, त्यात काम करणे यात खरी जीवनाची मजा आहे. आपली आवड जोपसणे महत्त्वाचे. आत दीपिकाचा असा मोलाचा सल्ला ऐकून तिच्या अनेक चाहत्यांना दिलासा मिळाला असेल.}}}}