Join us

‘बीबीडी’साठी दीपिकाची केली होती निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:36 IST

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या ज्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे अशा ‘बार बार देखो’ चित्रपटात अगोदर कॅट ऐवजी ...

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या ज्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे अशा ‘बार बार देखो’ चित्रपटात अगोदर कॅट ऐवजी दीपिका पदुकोन हिची निवड केल्याचे कळते आहे. कॅट-सिद्धार्थ यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘काला चश्मा’ या गाण्याला यूट्यूबवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत.कॅटचा यातील सिझलिंग अवतार याची खुप चर्चा सुरू आहे. ‘बीबीडी’ पहिल्यांदा हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोन यांना मुख्य भूमिकेत घेऊन करायचा होता. पण, हृतिकला वेळ नसल्याने सिद्धार्थ आणि कॅट यांना विचारण्यात आले.त्यांच्याकडे चित्रपटासाठी तारखा उपलब्ध असल्याने मग नित्या मेहरा यांनी ठरवले की, ‘बीबीडी’ मध्ये दीपिका-हृतिकऐवजी कॅटरिना-सिद्धार्थ यांनाच घ्यावे.’