Join us

कधीही पूर्ण होणार नाही दीपिकाची ही इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 19:37 IST

दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आजघडीची एक यशस्वी अभिनेत्री. पैसा, प्रसिद्धी, यश सगळे काही दीपिकाच्या पायाशी लोळण घेत आहे. दीपिकाचा ...

दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आजघडीची एक यशस्वी अभिनेत्री. पैसा, प्रसिद्धी, यश सगळे काही दीपिकाच्या पायाशी लोळण घेत आहे. दीपिकाचा बॉलिवूडमधील चढता आलेख बघून दीपिका तिच्या फिल्मी करिअरबद्दल कमालीची समाधानी आहे, असेच सर्वांना वाटेल. किंबहुना एक अभिनेत्री म्हणून दीपिकाची कुठलीही इच्छा उरलेली नसावी, असेही तुम्हाला वाटून जाईल. पण असे मुळीच नाहीय. दीपिकाची एक इच्छा अपूर्ण आहे आणि दुर्दैव म्हणते भविष्यातही ती अपूर्णच राहणार आहे. होय, बॉलिवूडच्या फिल्मी करिअरमध्ये दीपिकाल यश चोप्रा यांच्यासोबत एकदातरी काम करण्याची इच्छा होती. पण दीपिकाची ही इच्छा म्हणजे कधीही पूर्ण न होणारी इच्छा ठरली. सो सॅड दीपिका... यशजींच्या चित्रपटात तुला पाहणे आम्हालाही नक्कीच आवडले असते. पण शेवटी नियतीपुढे कुणाचे चालणार!!