Join us

दीपिका बोलली अन् करिना दुखावली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 19:28 IST

करिना कपूरची प्रेग्नंसी सध्या ‘ट्रेंड’मध्ये आहे. पण करिना मात्र यामुळे जाम वैतागली आहे. तिच्या प्रेग्नंसीबाबत मीडियात सुरु असलेल्या चर्चा ...

करिना कपूरची प्रेग्नंसी सध्या ‘ट्रेंड’मध्ये आहे. पण करिना मात्र यामुळे जाम वैतागली आहे. तिच्या प्रेग्नंसीबाबत मीडियात सुरु असलेल्या चर्चा व बातम्यांचा करिनाला अगदीच वैताग आला आहे. त्यामुळेच माझी प्रेग्नंसी काही राष्ट्रीय आपत्ती नाही. एखाद्या राष्ट्रीय दुर्घटनेप्रमाणे या गोष्टीची चर्चा करणे बंद करा, अशा शब्दांत तिने माध्यमांना खडसावले. पण इतके करूनही करिनाचा वैताग संपण्याची चिन्हे नाहीत. आता तर तिचा वैताग जास्तच वाढला आहे. कारण यावेळी मीडिया नाही तर खुद्द दीपिका पदुकोण हिनेच करिनाला डिवचले आहे. रणवीर व दीपिकाचा साखरपुडा झाल्याची चर्चा काहीदिवसांपूर्वी मीडियात रंगली होती.  पण दीपिकाने ही चर्चा खोटी असल्याचे सांगितले. मी सध्यातरी लग्न करणार नाही आणि  गरोदरही नाहीय, असे ती म्हणाली. पण दीपिकाचे नेमके हेच शब्द करिनाला झोंबले. दीपिकाने हे विधान आपल्याच गरोदरपणाला अनुसरुन केले गेले आहे असाच करिनाचा समज झाला. त्यामुळेच करिना दीपिकावर नाराज असल्याची खबर आहे. आता हे ‘कोल्डवॉर’ कसे आणि कुठे येऊन संपते, ते बघूयात!!