Join us

​दीपिकाने उघड केला करिअरचा सीक्रेट प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 17:35 IST

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलीवूडपटाचे शूटींग संपले आणि दीपिका पादुकोण मुंबईत परतली. लवकरच दीपिका ...

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलीवूडपटाचे शूटींग संपले आणि दीपिका पादुकोण मुंबईत परतली. लवकरच दीपिका ‘पद्मावती’ या तिच्या आगामी बॉलिवूडपटाचे शूटींग सुरु करणार आहे. यानंतर दीपिकाचा करिअर प्लॅन काय असणार? ती हॉलिवूडवर लक्ष केंद्रीत करणार की बॉलिवूडवर लक्ष देणार? असे अनेक प्रश्न आमच्यासह दीपिकाच्या चाहत्यांना पडले होते. पण एका इव्हेंटमध्ये खुद्द दीपिकानेच या प्रश्नांची उत्तरे दिलीत.   हॉलिवूड आणि बॉलिवूड असा काहीही भेद मी करत नाही. माझ्यासाठी चित्रपट आणि चित्रपटातील भूमिका एवढेच महत्त्वाचे आहे. केवळ भाषेचा फरक असल्याने काहीही बदलत नाही. त्यामुळेच माझ्यासाठी हॉलिवूड वा बॉलिवूड दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत तर माझ्या करिअरमधील टप्पे आहेत. उद्या मझ्याकडे एखादा साऊथ इंडियन चित्रपट चालून आला आणि त्याची कथा व भूमिका मला आवडलीच तर मी तोही करेल, असे हटके उत्तर दीपिकाने दिले. एकंदर काय तर हॉलिवूड असो वा बॉलिवूड दीपिकाच्या करिअरची गाडी आता थांबवणार नाही, एवढचं खरं!!