Join us  

Deepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 9:48 AM

दीपिका आता भवनानी कुटुंबाची सून झाली आहे. साहजिकचं दीपिकासारखी सून मिळाल्याने भवनानी कुटुंब सध्या जाम आनंदात आहेत.

ठळक मुद्देरणवीर व दीपिका कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्नबेडीत अडकलेत. या दोन्ही लग्नाचा एक एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. सिंधी वेडिंगमध्ये रणवीरने पिंक-गोल्डन कांजीवरम शेरवानी, डोक्यावर फेटा बांधला आहे. तर दीपिकाने लाल रंगाचा पारंपरिक लेहंगा घातला आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्यावर लग्नानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता दीपिका भवनानी कुटुंबाची सून झाली आहे. साहजिकचं दीपिकासारखी सून मिळाल्याने भवनानी कुटुंब सध्या जाम आनंदात आहेत. दीपिकाचे सासरेबुवा अर्थात रणवीरचे पापा जगजीत सिंह भवनानी यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. रणवीर सिंगची स्टाईलिस्ट निताशा गौरव हिने आपल्या इन्स्टास्टोरीवर याचा खुलासा केला आहे. ‘सीनिअर भवनानींच्या शब्दांत... ये दिवानी तो भवनानी हो गई...’, अशी पोस्ट निताशाने शेअर केली आहे. (रणवीरच्या पापाचा  ‘ये दिवानी तो भवनानी हो गई...’हा डायलॉग ‘बाजीराव मस्तानी’तील ‘ये दीवानी मस्तानी हो गई’ या गाण्याशी मिळताजुळता आहे.)

रणवीरच्या पापांच्या या भावना बघता, ते सध्या किती आनंदात आहेत, याचा अंदाज आपण बांधू शकतो. 

या शिवाय निताशाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाऊस पडणार होता. पण वातावरण स्वच्छ आहे. सूर्य तळपत आहे...फक्त या दोघांसाठी....’, असे तिने लिहिले आहे.रणवीर व दीपिका कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्नबेडीत अडकलेत. या दोन्ही लग्नाचा एक एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. सिंधी वेडिंगमध्ये रणवीरने पिंक-गोल्डन कांजीवरम शेरवानी, डोक्यावर फेटा बांधला आहे. तर दीपिकाने लाल रंगाचा पारंपरिक लेहंगा घातला आहे. माथ्यावर बिंदी, मेहंदी सजलेल्या हातातील लाल चुडा सगळे काही तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. कोंकणी लग्नात रणवीरने पांढ-या रंगाचा कुर्ता आणि दीपिकाने गोल्डन कांजीवरम साडी नेसलेली दिसतेय.   

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग