Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयफामध्ये दीपिका ते प्रियंकाच्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 17:14 IST

आयफामध्ये दीपिका ते प्रियंकाच्या अदाशुक्रवारी आयफा पुरस्कारात माद्रिदमध्ये फॅशनचा जलवा पाहण्यास मिळाला. दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुरुवारी त्यांनी रेड कार्पेटवरील रंग अर्थात लाल रंग परिधान केला होता.

शुक्रवारी आयफा पुरस्कारात माद्रिदमध्ये फॅशनचा जलवा पाहण्यास मिळाला. दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुरुवारी त्यांनी रेड कार्पेटवरील रंग अर्थात लाल रंग परिधान केला होता. दीपिकाने प्रबळ गुरुंगने तयार केलेला ड्रेस परिधान केला होता. २०१२ साली अँजेलिना जोलीने ज्या पद्धतीने ड्रेस परिधान केला होता, अगदी तशाच पद्धतीचा हा होता. अभिनेत्री प्रियंका चोप्राने आयफाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ब्लॅक टॉप आणि मेटॅलिक मार्क जेकब्जचा स्कर्ट परिधान केला होता. तिने इन्स्टाग्रामवरही आपला फोटो शेअर केला. सोनाक्षी सिन्हा पांढºया कॅपच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. रोहित गांधी आणि राहुल खन्नाने हा ड्रेस डिझाईन केला होता. तिच्या हेअरडोने तिला सर्वोच्च स्थानी नेले.अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शिवान आणि नरेश यांनी तयार केलेला आॅरेंज जंपसूट परिधान केला होता. आथिया शेट्टी बोहो चिक ड्रेस परिधान केला होता.