Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ दीपिका पादुकोणचा असाही हट्ट; मला मोठे हॉलिवूड प्रोजेक्टच हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 14:05 IST

दीपिका पादुकोण बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये दीपिकाने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण हॉलिवूडमध्ये अजुनही तिला ते साधलेले नाही. ...

दीपिका पादुकोण बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये दीपिकाने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण हॉलिवूडमध्ये अजुनही तिला ते साधलेले नाही. नाही म्हणायला, दीपिका पादुकोणचा पहिला वहिला हॉलिवूडपट आला खरा पण भारतात त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटाकडून दीपिकाला बºयाच अपेक्षा होत्या. विन डिझेलसोबतच्या या चित्रपटाने आपले हॉलिवूड करिअर मार्गी लागेल, असे दीपिकाला वाटले होते. पण असे काही दिसले नाही. कदाचित म्हणूनच दीपिका आपल्या हॉलिवूड करिअरबद्दल फार समाधानी नाही. सुरुवात दमदार व्हायला हवी होती, पण ती तितकी दमदार झाली नाही, ही बाब दीपिकाला आतल्या आत पोखरू लागली आहे. त्याचा परिणाम काय? तर एक नवी स्ट्रॅटेजी. होय, आपल्या हॉलिवूड करिअरला आणखी गती देण्यासाठी दीपिकाने म्हणे एक नवी रणनीति आखली आहे.ALSO READ :  दीपिका पादुकोण म्हणते, मी लग्नासाठी तयार नाहीया रणनीतिचा एक भाग म्हणजे, दीपिका आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल कमालीची सतर्क झाली आहे. मला एखादा मोठा हॉलिवूड प्रोजेक्ट हवा, असे तिने तिचे हॉलिवूडचे काम पाहणाºया टीमला स्पष्ट शब्दांत बजावले आहे. तूर्तास दीपिकाकडे हॉलिवूडच्या आॅफर्स आहेत. पण त्यात दम नाही. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही दमदार भूमिकाच करायच्या, हे दीपिकाने ठरवून टाकले आहे. त्यामुळे तिला अशाच भूमिकेची प्रतीक्षा आहे. दीपिकाची ही नवी रणनिती किती यशस्वी होते आणि दीपिकाला भविष्यात कुठले हॉलिवूड प्रोजेक्ट मिळतात, हे पाहणे त्यामुळेच इंटरेस्टिंग होणार आहे.तूर्तास दीपिका बॉलिवूडमध्ये बिझी आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.