Join us  

लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 11:39 AM

लग्नात दीपिकाच्या सौंदर्यांला तिने परिधान केलेल्या लेहंग्यामुळे चारचाँद लागले होते. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले होते.

बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं नाव स्टाइलच्या बाबतीत सगळ्यात आघाडीवर असतं. रिल लाईफ असो किंवा रिअल मस्तानी दीपिकाच्या स्टाईलवर सारेच फिदा होतात. नेहमीच दीपिका आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलने उपस्थितांच्या नजरा आकर्षित करते.मात्र दीपिकाची सर्वाधिक चर्चा तिच्या लग्नावेळी झाली होती. यावेळी रणबीर दीपिकाचे लग्न चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय होता. त्याचबरोबर लग्नात दीपिकाच्या सौंदर्यांला तिने परिधान केलेल्या लेहंग्यामुळे चारचाँद लागले होते. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले होते.

 

सर्वत्र दीपिकाची ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशनची चर्चा होती. दीपिकाने लग्नात परिधान केलेला लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केला होता.विशेष म्हणजे या लेहंग्यावर दीपिकाने ओढलेल्या दुपट्ट्यावर सदा सौभाग्यवती भव असं लिहिलं होतं. दीपिकाने परिधान केलेल्या गोल्डन-रेड कॉम्बिनेशन असलेल्या या लेहंग्याची किंमत तब्बल 9  लाख रुपये इतकी होती.

 

इतकंच नाही तर मुंबईतील रिसेप्शनला एकदा तिने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस तर एकदा लाल रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला होता. आपल्या या मनमोहक आणि आकर्षक स्टाइलिश लेहंग्याने तिने सा-यांचीच मने जिंकली होती. 

अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले

शनिवारी दीपिका चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात गेली होती. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला २०१७ च्या चॅटबद्दल प्रश्न विचारले. माल आहे का, असा प्रश्न तू चॅटमध्ये विचारला होतास. मालचा अर्थ काय?, असा सवाल अधिकाऱ्यांनी विचारला. त्यावर हो, मी तो प्रश्न विचारला होता. पण तुम्ही जो अर्थ काढलाय, त्या अर्थानं मी तो प्रश्न विचारला नव्हता, असं उत्तर दीपिकानं दिलं. आम्ही सिगारेटला माल म्हणतो. सिगारेटसाठी तो आमचा कोड वर्ड आहे, असं ती पुढे म्हणाली.

सिगारेट ओढतो, पण अमली पदार्थ घेत नाही- दीपिका 

आम्ही सिगारेट ओढतो. पण अमली पदार्थ घेत नाही, असा दावा दीपिकानं केला. आपण सांगत असलेले कोड वर्ड योग्य असल्याचं म्हणत तिनं चित्रपट उद्योगातील संवादांचा दाखला दिला. इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार संवाद साधताना बऱ्याच कोडवर्ड्सचा वापर करतात, असं दीपिकानं सांगितलं.

.  

 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग