इन्स्टाग्रामवर दीपिका पादुकोणचे सगळ्यात जास्त फोलॉवर्स तर प्रियांका चोप्राचा दुसरा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 13:50 IST
दीपिका पादुकोण इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री बनली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे. प्रियांकाने दीपिकाला ...
इन्स्टाग्रामवर दीपिका पादुकोणचे सगळ्यात जास्त फोलॉवर्स तर प्रियांका चोप्राचा दुसरा नंबर
दीपिका पादुकोण इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री बनली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे. प्रियांकाने दीपिकाला चांगली टक्कर दिली आहे. दीपिकाचे इन्स्टाग्रामवर 17.5 मिलियन फॉलोवर्स आहेत तर प्रियांकाचे 17.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. दीपिकाने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 357 पोस्ट केल्या आहेत तर प्रियांकाने 1919 पोस्ट केल्या आहेत. दीपिकाच्या तुलनेत प्रियांका इन्स्टावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. या दोघींनंतर सोनम कपूरचा नंबर आहे. सोनमचे इन्स्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोवर्स आहेत मात्र पोस्ट टाकण्याच्या शर्यतीत ती या दोघींच्या ही पुढे आहे. सोनमने आतापर्यंत 2554 पोस्ट टाकल्या आहेत. दीपिका आणि सोनमने बॉलिवूडमध्ये एकत्रच एंट्री केली आहे. दोघींचा पहिला चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. यानंतर दीपिका आणि सोनम रणबीर कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. इन्स्टाग्रामच्या एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार जे लोक खऱ्या गोष्टीसंबंधीत पोस्ट करतात त्यांचे फॉलोअर्स वाढण्याऐवजी नेहमीच कमी होतात. जर तुम्ही हॅशटॅगसोबत पोस्ट शेअर करत असाल तर तुम्ही इन्स्टाग्रामवर जास्त पॉप्युलर व्हाल असे एक्सपर्टचे मत आहे. दीपिका पीकू, बाजीराव-मस्तानीसारख्या बॉलिवूडच्या हिट चित्रपटांमध्ये दिसली होती. नुकतेच तिने हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. 'xxx : रिटर्न ऑफ द झेंडर केज' या चित्रपटात ती हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेलसोबत दिसली होती. सोनम कपूरला नीरज तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीरजा भानोट हिच्या बायोपिकमध्ये सोनमने नीरजाची भूमिका साकारली होती. ज्यासाठी तिचे सगळ्यांनी कौतुक केले होते.