या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील दीपिकाच्या ओठांवरचे हसू पाहतचं राहावेसे वाटते. यापूर्वी दीपिका कुठल्याही फोटोशूटमध्ये इतकी खळखळून हसली नाही. पण या फोटोशूटची बातचं न्यारी. त्यामुळेच फन अन् लव्हिंग दीपिकाला हा अंदाज लोकांना जाम आवडलाय. तिचे हे फोटो लोकांना कमालीचे आवडले आहेत.
ALSO READ : स्वरा भास्करच्या खुल्या पत्रावर दीपिका पादुकोणने दिले असे उत्तर!
‘पद्मावत’च्या रिलीजनंतर दीपिका सध्या मीडियात मुलाखती देतांना दिसतेय. चित्रपटाशी संबंधित अनेक खुलासे तिने केले आहेत. ‘जौहर’चा सीन माझ्यासाठी सगळ्यात कठीण सीन होता, असे तिने सांगितले.
भविष्यातही तू ‘पद्मावत’सारखे चित्रपट करणार का? असा प्रश्न तिला अलीकडे एका इव्हेंटमध्ये केला गेला. यावर ‘इतना सब होने के बाद कभी नहीं,’ असे उत्तर दीपिकाने दिले. करणी सेनेच्या धमक्या आणि विरोधानंतर मी स्वत:ला सांभाळू शकते, याची माझ्या पालकांना पूर्ण खात्री होती. योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक त्यांनी आम्हा दोघी बहिणींना शिकवला आहे. सत्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे त्यांनी आम्हाला शिकवलेय. मी तेच केले, असेही तिने यावेळी सांगितले.