Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दीपिका पादुकोणच्या बिल्डिंगला लागली आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:05 IST

दीपिका पादुकोण दादर येथील प्रभादेवी परिसरातील ब्यू मोंडे टॉवरला नुकतीच आग लागली. या बिल्डिंगच्या ३३ व्या मजल्यावर आग लागली ...

दीपिका पादुकोण दादर येथील प्रभादेवी परिसरातील ब्यू मोंडे टॉवरला नुकतीच आग लागली. या बिल्डिंगच्या ३३ व्या मजल्यावर आग लागली असून ही आग प्रचंड प्रमाणात पसरलेली आहे. आग विझवण्यासाठी १० अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दीपिका पादुकोणचे याच बिल्डिंगमध्ये घर आणि ऑफिस आहे. या बिल्डिंगच्या २४ व्या मजल्यावर दीपिकाचे घर असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीये. आतापर्यंत ९०-९५ लोकांना सुखरूपपणे बिल्डिंगच्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. बिल्डिंगला आग लागली त्यावेळी दीपिका घरात नसल्याचे सांगण्यात आले आहे. दीपिका ही एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी ती गेली असून तिचा स्टाफ घरात होता. पण या सगळ्यांना घराच्या बाहेर सुरक्षितपणे काढण्यात आले आहे. दीपिका पादुकोणने हे घर २०१० ला विकत घेतले होते. हे घर तिच्या आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांच्या नावावर आहे.