Join us  

NCB ऑफिसपर्यंत मीडियाने पाठलाग करू नये म्हणून दीपिकाने वापरली होती 'ही' ट्रिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 2:32 PM

दीपिकाचे एनसीबी ऑफिसमधील मोजकेच फोटो व्हायरल झाले आहेत. अशात दीपिकाने मीडिया आणि कॅमेराने तिचा पाठलाग करू नये म्हणून एक ट्रिक वापरल्याची बाब समोर आली आहे.

दीपिका पादुकोणची एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे. जेव्हा ती एनसीबीच्या ऑफिसला पोहोचली तेव्हा तिचे फोटो टिपण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तिचे एनसीबी ऑफिसमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. अशात दीपिकाने मीडिया आणि कॅमेराने तिचा पाठलाग करू नये म्हणून एक ट्रिक वापरल्याची बाब समोर आली आहे.

दीपिका पादुकोणचं घर वरळीमध्ये आहे. नवभारत टाइम्सने टाइम्स नाउच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, दीपिका कुलाबामध्ये NCB च्या ऑफिसजवळील हॉटेलमध्ये थांबली होती. जेणेकरून मीडियाच्या गाड्यांनी तिचा पाठलाग करू नये. तसेच दीपिका वेळेवर एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचावी असाही त्यामागचा उद्देश असल्याचे बोलले जाते. दीपिकाला बुधवारी समन्स पाठवण्यात आला होता. त्यावेळी ती गोव्यात शकुन बत्राच्या सिनेमाचं शूटींग करत होती. गोव्याहून परत येताना मीडियाच्या गाड्यांनी तिच्या गाडीचा पाठलाग केला होता. असं पुन्हा होऊ नये म्हणून तिने ही ट्रिक वापरली.

असेही सांगितले जात आहे की, दीपिकाने छोटी आणि नेहमी वापरत नसलेली कार निवडली होती. कारण या कारचा नंबर कुणालाही माहीत नव्हता. दीपिका वेळेवर एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिला आणि तिची मॅनेजर करिश्माला समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जात आहेत. असंही समजतं की, एनसीबी दीपिकाच्या उत्तरांनी संतुष्ट नाहीत.

दरम्यान करिश्माने शुक्रवारी चौकशी दरम्यान ती ड्रग्स घेत नसल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, ती टोबॅको सिगारेट ओढते. आता जेव्हा दीपिका-करिश्माला समोरासमोर बसवून ड्रग चॅटवरून प्रश्न विचारले तेव्हाही तिने ड्रग्स घेत नसल्याचं म्हटलंय. NCB ने विचारले की, चॅटमध्ये वीड/हॅश कुणासाठी मागवलं होतं? यावर दोघींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं बोललं जात आहे.

हे पण वाचा :

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

दीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड

धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडअमली पदार्थ