Join us  

OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:46 PM

झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करते दीपिका.

दीपिका पादुकोण आणि तिची बहिण अनिशामध्ये चांगले बॉन्डिग आहे. सोशल मीडियावरील फोटो याचाच पुरावा आहेत. अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात दीपिकासोबत उपस्थिती लावते. अनिषा ही गोल्ड प्लेअर असून ती आपल्या देशाचे आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते.दोघे आपले सिक्रेट शेअर करत असतात. ऐवढेच नाही तर दोघींचे एकाच सेलिब्रेटीवर क्रश आहे. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दोघींनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, दीपिका आणि अनीशा एकमेकींच्या रुम पार्टनर होत्या. याच रुममध्ये त्या अनके तासात खेळत असायच्या. त्यांच्या रुममध्ये हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ पोस्टर लावलेले होते. दोनही बहिणींनी एकच अभिनेता आवडायचा. दीपिकाने सांगितले की, दोघी झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करायच्या. 

सध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत सेल्फ क्वारांटाईन आहे. दीपिका बहिणीला खूप मिस करते आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती अशी चर्चा रंगली होती.निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग