Join us

दिल्लीमध्ये दीपिका पादुकोण उकाड्यापासून करतेय स्वत:चे असे संरक्षण, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:43 IST

सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

ठळक मुद्देदिल्लीच्या उन्हात शरीराचे तापमान सांभाळण्यासाठी ती हे पेय पितेदीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे

सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे ती आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देते तसेच उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी ती सात्तूचे पेय घेते. दिल्लीच्या उन्हात शरीराचे तापमान सांभाळण्यासाठी ती हे पेय पिते. 

दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने छपाक सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसत होती. 'छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. यात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे.

दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. 'छपाक' सिनेमा दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे.  छपाक' सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक