Join us

इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... म्हणत या प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला हा फोटो, दिसतेय खूपच गोंडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:07 IST

हा फोटो क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासांत सात लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

ठळक मुद्देदीपिकाने तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दीपिकाने तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासांत सात लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तू लहानपणी देखील तितकीच क्यूट दिसत होतीस असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या द्वारे सांगत आहेत. 

दीपिकाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर भुरळ पाडली आहे. ती बॉलिवूडवर राज्य करते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने केला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमातही तिची छोटीशी भूमिका असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण