Join us  

लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड लूकमध्ये दिसली दिपिका पदुकोण, 'हे' फोटो होतायेत Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:00 AM

नुकतेच मुंबईत झालेल्या रिसेप्शन दरम्यान रणवीर आणि दीपिका या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला . यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता.

लग्नबंधनात अडकल्यानंतर ५ दिवसांनी ‘दीपवीर’ने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. ‘दीपवीर’चे फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला होता.दीपिकाच्या लग्नाचे फोटोंची जादू सोशल मीडियावर संपत नाही तोपर्यंत दीपिकाचा हॉट अंदाज समोर आला आहे. 

लग्नानंतर दीपिकाचा हॉट अंदाजातले फोटो पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस दिल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोशूटमधला दीपिकाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.  दीपिकाचा हा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे.या प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

नुकतेच मुंबईत झालेल्या  रिसेप्शन दरम्यान रणवीर आणि दीपिका या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला . यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावरह शेअर करताच लगेच व्हायरल झाले. इटलीतील लेक कोमो  इथं दीपिका आणि रणवीर यांचं शुभमंगल पार पडलं. १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.

रिसेप्शनमध्ये दीपिकासोबतच आणखी एका व्यक्तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती रणवीरच्या कुटुंबियातील एक असून रणवीरच्या खूपच जवळची आहे.ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून रणवीर सिंगची आई अंजू भवनानी आहे. रणवीर सिंगची आई अंजू भवनानी दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये ब्लॅक-गोल्डन लेहंग्यात दिसल्या होत्या. त्यांच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दीपिकाचे कुटुंब क्रीम रंगाच्या थिममध्ये तर रणवीरचे कुटुंब काळ्या रंगाच्या थिममध्ये दिसले होते. या रिसेप्शनमध्ये सगळेच छान दिसत होते. पण रणवीरची आई ही अतिशय सुंदर दिसत असून तिची सून दीपिकाला चांगलीच टक्कर देत आहे असे नेटिझन्सचे म्हणणे होते. त्यांनी अशा अनेक प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर दिल्या आहेत.  

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगदीप- वीर