दीपिका पादुकोण म्हणते, मी लग्नासाठी तयार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 14:12 IST
‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण एकदम हवेत आहे आणि का नसावे? या हॉलिवूडपटातील ...
दीपिका पादुकोण म्हणते, मी लग्नासाठी तयार नाही
‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण एकदम हवेत आहे आणि का नसावे? या हॉलिवूडपटातील दीपिकाच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा होतेय. सगळ्या हॉलिवूड नट्यांना धडकी भरावी, असा अभिनय दीपिकाने केलाय. सध्या दीपिका बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ‘पद्मावती’मधील भूमिकेमुळे तर दीपिकाचे भाव आणखीच वाढले आहेत. एकंदर काय तर सध्या प्रोफेशल लाईफमुळे दीपिका प्रकाशझोतात आलीय. पण केवळ प्रोफेशनलच नाही तर दीपिकाची पर्सनल लाईफही सध्या चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या ‘प्रेमलीला’ सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ च्या प्रीमिअर पार्टीला दीपिका आणि रणवीर अगदी हातात हात घालून पोहोचले होते. यानंतर डिप्पी व रणवीरमध्ये नक्कीच काहीतरी शिजतेय, यावर जणू शिक्कामोर्तब झाले होते. अलीकडे एका मुलाखतीत दीपिका तिचे रिलेशनशिप स्टेटस आणि लग्नाबद्दलचे तिचे विचार यावर अगदी खुलेपणाने बोलली.लाँग डिस्टेंट रिलेशनशिपबद्दल दीपिकाला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, मी रिलेशनशिपबद्दल फार एक्स्पर्ट वगैरे नाही. नात्यात नेमके काय असते, ते मला माहित नाही. पण नाते जसे घडवाल, तसे घडते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नातं अगदी सहज-सोप आणि सुंदर असू शकतं तसच ते गुंतागुंतीचही असू शकतं. माझ्यामते,हे सर्वस्वी त्या नात्यात असणाºया दोन लोकांवर अवलंबून असते.यानंतर दीपिकाला लग्नाबद्दल विचारण्यात आले. दीपिका ३१ वर्षांची झाली आहे. त्यामुळे लग्नाबद्दल तिला विचारला गेलेला प्रश्न अगदी स्वाभाविक होतास. यावर दीपिका अगदी बिनधास्त बोलली. वयाचा आणि लग्नाचा काही संबंध असतो, असे मला अजिबात वाटत नाही. लग्न हे मानसाच्या भावना आणि आयुष्यातील स्थिती यावर अवलंबून असते. काही लोक चाळीशी ओलांडूनही लग्न करत नाही तर काहीजण अगदी २१-२२चे होताच लग्न उरकून मोकळे होतात. माझे विचाराल तर पर्सनली मी अद्याप लग्नासाठी तयार नाही, असे दीपिकाने सांगून टाकले. आता दीपिकाने हे सांगितले खरे पण यामुळे रणवीरच्या भावना दुखावू नयेत, म्हणजे झाले.Related stories : New Photoshoot : इतकी ‘ब्युटिफुल’ दीपिका पादुकोण तुम्ही कधीच पाहिली नसेल!!For Adult Users Only !! दीपिका पादुकोणचा हा Morphed फोटो तुम्ही पाहिलातं का?रणवीर-दीपिकाने लपवले, ते विन डिझेलने सांगून टाकले!