Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दीपिका पादुकोण म्हणाली, माझे नाही, विन डिझेलचे माझ्यावर प्रेम होते!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 10:41 IST

दीपिका पादुकोण कालच कान्स फिल्म्स फेस्टिवलमधून परतली. रेड कार्पेटवरील तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच घायाळ केले. कान्समधील दीपिकाच्या लूकची चांगलीच ...

दीपिका पादुकोण कालच कान्स फिल्म्स फेस्टिवलमधून परतली. रेड कार्पेटवरील तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच घायाळ केले. कान्समधील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. पण हे काय, कान्समधून भारतात परत आली तरी दीपिकाबद्दलच्या चर्चा संपल्या नाहीत. होय, कान्समध्ये मीडिया इंटरॅक्शनदरम्यान दीपिकाला तिचा को-स्टार विन डिझेल याच्याबद्दल विचारण्यात आले. आता हा विन डिझेल कोण हे मात्र विचारू नका. (अहो, दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट ‘एक्स एक्स एक्स : रिटर्न  आॅफ झेंडर केज’मधील तिचा हिरो म्हणजेच हॉलिवूड स्टार विन डिझेल.) यावेळी मीडियाने दीपिकाला एक खट्याळ प्रश्न विचारला गेला. तुझ्या अनेक मुलाखती बघता, तू विन डिझेलच्या प्रेमात आहे, असे वाटतेय. हे खरे आहे का? असा प्रश्न दीपिकाला विचारले गेले. या प्रश्नावर दीपिकाची कळी चांगलीच खुलली.तिने काय उत्तर दिले माहितीय? माफ करा, मी नाही, तो माझ्यावर प्रेम करतो.  तो खूप प्रेमळ आहे. तो अद्भूत व्यक्ती आहे, ज्याला मी भेटले. तो उदार मनाचा आणि दयाळू व्यक्ती आहे. या हॉलिवूड प्रवासात मी जे काही शिकले, ते त्याच्याचमुळे. त्याने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. तो आयुष्यभर माझा मित्र राहिल, असे दीपिका म्हणाली. आता दीपिका जे बोलली, त्यापैकी काहीच शब्दांवर आमचे लक्ष गेले. होय, मी नाही, तो माझ्या प्रेमात होता, असे दीपिकाने म्हटले.cnxoldfiles/फँटसी आहेत. आम्ही दोघे एकत्र राहतो, आमचे मुले आहेत असे काही काही स्वप्न मी रंगवत असते, असे दीपिका म्हणाली होती.