Join us  

बॉलिवूडची टॉपची हिरोइन असूनही 'या' गोष्टीसाठी रणवीरवर अवलंबुन आहे दीपिका पादुकोण !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 7:15 AM

सोशल मीडियावर रणवीरचा अतरंगी फोटो पाहतचा नेटीझन्स मात्र त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसतायेत.

सध्या चित्रपटसृष्टीत अभिनेता रणवीर सिंहची भलतीच क्रेझ आहे. त्याने साकारलेला 'सिम्बा' चित्रपटातील संग्राम भालेराव भलताच भाव खावून गेला. 'सिम्बा' सिनेमाच्या प्रमोशनमध्येही रणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाइल सा-यांसाठी लक्षवेधी ठरली आहे. वेगवेगळ्या एव्हेंटसमध्ये रणवीरचा ड्रेसिंग स्टाइल पाहून सारेच थक्क व्हायचे. रणवीरचा आता ‘गली बॉय’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानही रणवीर ज्याप्रकारचे अतरंगी कपडे घालून दिसतोय, त्यावरून त्याची जोरदार खिल्ली उडवली जातेय. त्याच्या चित्र-विचित्र स्टाइलवरचे अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर रणवीरचा अतरंगी फोटो पाहतचा नेटीझन्स मात्र त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसतायेत. रणवीर दीपिकाचे कपडे उधार घेतो की काय असाही विनोदी सवाल अनेकजण त्याला सोशल मीडियावर विचारतात. मात्र रणवीर नाही तर मी त्याचे कपडे उधार घेते असं मजेशीर उत्तर  दीपिकानं नेटीझन्सना दिले आहे. 

  लग्नाआधीपासूनच  हे दोघेही लव्हबर्ड सतत चर्चेत असतात. छोट्यातली छोटी गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. त्यामुळे लग्नाआधी आणि लग्नानंतर रणवीरचा अनुभव कसा आहे या प्रश्नावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याने सांगितले होते की, दीपिकासोबत लगीनगाठ बांधली गेल्यानंतर मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतंय, स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटतंय, असंही रणवीरनं प्रांजळपणे सांगितलं. आता तिला पुढे ठेवून, तिच्या पावलावर पाऊल टाकत चालणार आहे. बायकोच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं असतं, असं मी ऐकलंय. मी तसाच वागणार आहे, असं तो हसत-हसत म्हणाला.

 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग