आता तुम्ही म्हणाल की, आता हा विषय सांगण्यामागचे नेमके कारण काय? तर दीपिकाने नुकतेच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आपल्या बहिणीसोबत हजेरी लावली होती. या चॅट शोदरम्यान जेव्हा नेहाने दीपिकाला ‘तू तुझ्या लग्नात कॅटरिनाला बोलाविणार काय?’ असा प्रश्न विचारला तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता नाही असे उत्तर दिले. २०११ मध्ये रणबीर कपूरने कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता की, त्याने नकळतपणे दीपिकासोबत नाते तोडले. ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे त्याने जाहीरपणे मान्य केले होते.
खरं तर जेव्हा रणबीर दीपिकासोबत नात्यात होता, तेव्हा त्याने कॅटरिनासोबत जवळिकता वाढविली होती. मात्र याबाबतचे शल्य आजही त्याच्या मनात आहे. असो, सध्या दीपिका आणि रणबीरच्या नात्यात पहिल्यासारखा दुरावा नाही. ते आज एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र कॅट आणि दीपिकाची दुश्मनी मात्र दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे.