Join us  

म्हणे, रणवीरपेक्षा ना एक पैसा कमी, ना एक पैसा जास्त...! दीपिकाने हातचा गमावला भन्साळींचा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 2:05 PM

होय, दीपिकाने या सिनेमासाठी अशी काही डिमांड केली की, मेकर्सचे डोळे पांढरे झालेत.

ठळक मुद्देअर्थात मेकर्सनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र भन्साळी प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांच्या मते, दीपिका या सिनेमात नाही हे एकार्थाने बरेच झाले. कारण रणवीर व दीपिका या जोडीसोबत चार सिनेमे थोडे अतीच झाले असते.

संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) ‘बैजू बावरा’ (Baiju Bawra)  या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूर भन्साळींची पहिली पसंत होता, अशी चर्चा होती. पण यानंतर या सिनेमासाठी रणवीर सिंगचे (Ranveer Singh) नाव फायनल झाल्याची बातमी आली. आता ‘बैजू बावरा’साठी रणवीरच्या अपोझिट दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) नावावर विचार सुरू असल्याची चर्चा रंगली. अर्थात आत्ताची चर्चा खरी मानाल तर कदाचित दीपिकाचा पत्ता कट झाला आहे. कारण आहे दीपिकाच्या वाढलेल्या अपेक्षा. होय, दीपिकाने या सिनेमासाठी अशी काही डिमांड केली की, मेकर्सचे डोळे पांढरे झालेत.

संजय लीला भन्साळी यांनी रणवीर व दीपिका या जोडीसोबत रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारखे सुपरहिट सिनेमे दिलेत.   ‘बैजू बावरा’तही ही जोडी घेण्याची त्यांची इच्छा होती. पण यादरम्यान दीपिकाच्या डिमांडपुढे कदाचित भन्साळींचा नाईलाज झाला.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरला जितकी फी मिळेल, तेवढीच मलाही मिळावी. त्याच्यापेक्षा एक पैसाही मी कमी घेणार नाही, असे दीपिकाने ‘बैजू बावरा’च्या मेकर्सला स्पष्टपणे सांगितले. तिची ही अट ऐकून मकर्सनेही नकार कळवला. अर्थात मेकर्सनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र भन्साळी प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांच्या मते, दीपिका या सिनेमात नाही हे एकार्थाने बरेच झाले. कारण रणवीर व दीपिका या जोडीसोबत चार सिनेमे थोडे अतीच झाले असते.आता यातून काही मार्ग निघतो का? दीपिका काही तडजोड करते का? दीपवीर जोडीसोबत पुन्हा एकदा एकत्र भन्साळी एकत्र येतात का? हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगसंजय लीला भन्साळी