Join us  

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: बेगानी शादी में..... दिवाना, दीपिका-रणवीरच्या लग्नातून चांदी करण्यासाठी दोघांना हनीमून पॅकेजच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 9:00 PM

रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या दीपवीरच्या लग्नाचा मुहूर्त साधत स्वीस पर्यटन मंडळ स्वःची चांदी करून घेण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देलग्न झाल्यानंतर मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोघांनी लग्नाचे शानदार रिसेप्शन आयोजित केले आहेस्वित्झर्लंड पर्यटन मंडळाकडून हनीमून पॅकेजचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहेअप्रत्यक्षरित्या स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा फायदा होणार असल्याचा विश्वास स्वीस मंडळाला आहे

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह रेशीमगाठीत अडकत आहेत. दोघं जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणार आहेत. दोघांच्या लग्नाकडे फॅन्स आणि बॉलीवुडसह अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. या लग्नाच्या निमित्ताने विविध देशाचे पर्यटन मंडळं स्वतःची चांदी करून घेण्याच्या विचारात आहेत. दोघांनाही विविध देशांच्या पर्यटन मंडळांकडून पेड हनीमून ट्रीप पॅकेजेस ऑफर करण्यात येत आहेत. यांत स्वित्झर्लंड पर्यटन मंडळ आघाडीवर आहे. कारण रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या दीपवीरच्या लग्नाचा मुहूर्त साधत स्वीस पर्यटन मंडळ स्वःची चांदी करून घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळेच त्यांनी या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवलं आहे. यामुळे अप्रत्यक्षरित्या स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा फायदा होणार असल्याचा विश्वास स्वीस मंडळाला आहे. 

स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाकडून हनीमून पॅकेजचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे, मात्र दीपवीरने ते अद्याप स्वीकारलेले नाही. इटलीत लग्न झाल्यानंतर मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोघांनी लग्नाचे शानदार रिसेप्शन आयोजित केले आहे. त्यामुळे पूर्ण नोव्हेंबर यांत निघून जाणार असल्याने मोठ्या हनीमूनचे कोणतेही प्लानिंग दीपवीरने केलेलं नाही. रिसेप्शन सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच डिसेंबरमध्ये रणवीर पुन्हा बिझी होणार आहे. ३ डिसेंबरला त्याच्या आगामी 'सिंबा' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होईल आणि त्यानंतर हा सिनेमा २८ डिसेंबरला रिलीज होणार असल्याने तो त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असेल. त्यामुळे सध्या तरी मोठ्या हनीमूनचे दीपवीरचे कोणतेही प्लानिंग नसल्याचे समोर येत आहे. 

.ALSO READ:तेव्हाच बघायला मिळणार दीपवीरच्या लग्नाचे फोटो!! 

दीपिका व रणवीर स्वत: आपल्या या अतिशय खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेला आणि स्वत: निवडलेलाचं फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल, यासाठी त्यांनी इतका कडेकोट बंदोबस्त केला आहे. आपल्याशिवाय अन्य कुणीही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग