Join us  

'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:24 PM

दीपिका सध्या तिचा प्रेग्नेंसीचे दिवस एन्जॉय करत आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रणवीर-दीपिका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. दीपिका सध्या तिचा प्रेग्नेंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. नुकतेच तिनं एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

दीपिका सध्या भरतकाम करत आहे. तिच्या या नवीन छंदाची एक झलक तिनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटोमध्ये दीपिकानं केलेलं भरतकाम पाहायला मिळत आहे.  या फोटोला कॅप्शन देत, तिनं लिहिलं, 'आशा आहे की हे भरतकाम पूर्ण झाल्याचा फोटोही मी शेअर करू शकेन'.  दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

दीपिकाच्या या पोस्टवर बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हार्टची इमोजी  आणि अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिनं स्माईल इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. चाहत्यांनीही दीपिकाच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहलं, 'मला वाटते ही फुलकरी आहे. आई गरोदर असते तेव्हा अशी फुलकारी ती बनवते आणि जेव्हा मुलं जन्माला येतं तेव्हा त्याला ही भेट दिली जाते'. तर दुसऱ्या एका युजरनं दीपिकाला बेबी बंप दाखवण्याची विनंती केली. 

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'फायटर'मध्ये दिसली होती. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. शिवाय दीपिका लवकरच 'कल्की 2898 एडी'मध्ये साऊथ अभिनेता प्रभासबरोबर दिसणार आहे. पहिल्यांदाच  प्रभास आणि दीपिका एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. तसेच दीपिका ही  रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्येही पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटीरणवीर सिंगबॉलिवूड