Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राच्या नावामुळे संतापली दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 18:02 IST

बॉलिवूडच्या अभिनेत्रींमधील कॅटफाईट, शीतयुद्ध काही नवे नाही. बी-टाऊनच्या प्रसिद्ध अभिनेत्री एकमेकींचं कौतुक सहन करु शकत नसल्याची अनेक उदाहरणं आहेत. ...

बॉलिवूडच्या अभिनेत्रींमधील कॅटफाईट, शीतयुद्ध काही नवे नाही. बी-टाऊनच्या प्रसिद्ध अभिनेत्री एकमेकींचं कौतुक सहन करु शकत नसल्याची अनेक उदाहरणं आहेत. यातील सगळ्यात जास्त चर्चा होते ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्यामधील कॅटफाईटची. मात्र ही कॅटफाईट आता वेगळ्याच वळणावर पोहचली आहे. बॉलिवूडची मस्तानी परदेशी प्रसारमाध्यमांवर चांगलीच संतापली आहे. त्याचं झालं असं की एका कार्यक्रमादरम्यान परदेशी प्रसारमाध्यमांमधील एका प्रतिनिधीने दीपिकाला तिच्या नावाऐवजी प्रियांका चोप्रा नावाने हाक मारली. हीच गोष्ट मस्तानीला काही रुचली नाही. ही हाक ऐकून दीपिका मॅडमचा पारा चांगलाच चढला आहे. ही घटना म्हणजे वर्णभेद असल्याचा धक्कादायक आरोप दीपिकाने परदेशी प्रसारमाध्यमांवर केला आहे.ही चूक अजाणतेपणे नाही तर मुद्दामहून केली असून ही खरीखुरी वर्णभेदी शेरेबाजी असल्याचा आरोप दीपिकाने केला आहे. एका कार्यक्रमात घडलेला हा प्रकार आणि त्यानंतर दीपिकाचे हे आरोप त्यामुळे सा-यांनाच धक्का बसला आहे. दीपिका आणि प्रियांकामधील शीतयुद्ध कोणत्या थराला गेले आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.दीपिका आणि प्रियांका दोघीही सध्या बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.त्यामुळेच की काय या दोघींमधील ही कॅटफाईट दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या लोकप्रियतेमुळेच दीपिका लवकरच कान्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तसंच तिच्या आगामी पद्मावती सिनेमाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे संजय लीला भन्सालींच्या या सिनेमातून बॉलीवुडमध्ये यशाची नवी शिखरं गाठण्याची आशा दीपिकाला आहे. मात्र सध्या तरी दीपिकाने केलेल्या वर्णभेदाच्या आरोपांमुळे सारेच अचंबित झाले आहेत.