Join us  

Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 10:14 AM

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा.

ठळक मुद्देदीपिकाने यावेळी कस्टम मेड पिंक गाऊन परिधान केलेला होता. हा गाऊन डिझाईनर Zac Posen याने डिझाईन केलेला होता.

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये दीपिका ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पिंक ड्रेसमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. तूर्तास दीपिकाच्या ‘मेट गाला 2019’मधील लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दीपिकाने यावेळी कस्टम मेड पिंक गाऊन परिधान केलेला होता. हा गाऊन डिझाईनर Zac Posen याने डिझाईन केलेला होता.

 Camps: Notes on fashion ही यंदाच्या ‘मेट गाला 2019’ची थीम आहे. या थीमला फॉलो करत दीपिकाने 3 डी प्रिंटेड पीसला कम्बाइंड केले. दीपिकाच्या या लूकला शानदार हेयरडोसोबत कम्पलीट केले गेले.

सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मात्र चित्रपटाच्या शूटींगमधून ब्रेक घेत, दीपिका ‘मेट गाला 2019’मध्ये पोहोचली. दीपिकाचा ‘मेट गाला 2019’मधील लूकचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा पाहा आणि दीपिकाचा हा लूक तुम्हाला किती आवडला ते नक्की कळवा.

टॅग्स :दीपिका पादुकोणमेट गाला