दरम्यान, चारच दिवसांमध्ये चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्याने, दीपिका चांगलीच हरकून गेली आहे. विशेष म्हणजे तिने चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशनही केले आहे. गेल्या रात्री दीपिका जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिने राजस्थानी थाळीचा आस्वाद घेत सेलिब्रेशन केले. यावेळी दीपिका खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत होती. यावेळी दीपिकाने ग्रीन कलरचा शरारा आणि लॉन्ग कुर्ता परिधान केला होता. दीपिकाचा हा आउटफिट सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला होता.
राजस्थानी थाळीचा स्वाद घेताना दीपिका खूपच खूश असल्याचे दिसत होती. यावेळी तिने तिच्या चाहत्यांबरोबर सेल्फीही घेतली. शिवाय मीडियालाही तिने पोझ दिल्या. या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी सेना व इतर राजपूत संघटनांकडून विरोध केला जात होता. मात्र अशाही स्थितीत हा चित्रपट गेल्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र विरोधाचा सूर अजूनही कायम आहे.