Join us  

दीपिका पादुकोण - प्रियांका चोप्राचा असा ही याराना..मैत्रिणीसाठी बदलली रिसेप्शनची तारीख ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 3:32 PM

बॉलीवूडमध्ये सध्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. दीपवीर शिवाय प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा आहे

ठळक मुद्देदीपवीरच्या लग्नात इटलीमध्ये केवळ 30 लोकच असणार आहेतदीपिका-रणवीर भारतात दोन रिसेप्शन देणार आहे

बॉलीवूडमध्ये सध्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. दीपवीर शिवाय प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचे लग्न आणि दीपिकाचे रिसेप्शनची तारखी क्लॅश होण्याची चर्चा होती. मात्र ताजा माहितीनुसार या सगळ्या चर्चांचा आता पूर्णविराम लागला आहे.   14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर दीपिका-रणवीर भारतात दोन रिसेप्शन देणार आहे. यानंतर 21 नोव्हेंबरला मुंबईत तर 28 दीपिकाचे होम टाऊन बेंगळुरुमध्ये ठेवण्यात येणार आहे. आधी हे रिसेप्शन 1 डिसेंबरला होण्याची चर्चा होती मात्र आता याला पूर्णविराम लागला आहे. तर प्रियांका आणि निकचे लग्न 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर चालणार आहे. दोघे जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहे. 

दीपवीरच्या लग्नात इटलीमध्ये केवळ 30 लोकच असणार आहेत. त्यानंतर मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडच्या कालाकारांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.  रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगप्रियंका चोप्रानिक जोनासदीप- वीर